बंद

अद्वितीय फड प्रणाली

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा नदीच्या खोऱ्यात शेतकऱ्यांच्या सहकार्याने बांधलेली ही एक अद्वितीय प्राचीन सिंचन प्रणाली आहे. नदी खोरे सुमारे ३२५७ चौ किमी आहे. नदीच्या काठावर नदीचे पाणी वळविण्यासाठी सुमारे दोन-तीन मीटर उंचीचे दगडी भिंत बांधून विकसित केले आहे. ही प्राचीन यंत्रणा शेतकऱ्यांंची जमीन सिंचनावर करण्यासाठी शेतकऱ्यांना शेंदवड ते बेटावद या सहकारी तत्वावर आधारित आहे.

फड प्रणालीचा इतिहास फार प्राचीन आहे, याचा बहुधा मौर्य काळा मध्ये जन्म झाला. यादव यांनी या प्रणालीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. १३७६-१४७६ मध्ये खान्देशात दुर्गादेवीच्या काळात टंचाई असताना मलिक राजाफारुकी ने कृषी उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला. खान्देशातील शेतकरी या अद्वितीय फड प्रणाली वापरून पिके घेत होते, जसे की १५९९-१६००या काळात अबुलफजल यांनी सांगितले. त्याच प्रमाणे ट्रनियर थेवनो यांनी खान्देशात प्रवास करतांना या सिंचन प्रणालीबद्दल सांगितले.

या प्रणालीने दरी  क्षेत्रात  निवासस्थानाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जा प्रभावित केला आहे.