बंद

ग्रामपंचायत

रचना

जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे येथील ग्रामपंचायत शाखा हि जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणात काम करते. जिल्ह्यातील संबंधित तहसीलदार हे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संबधित तालुक्याचे निवडणूक अधिकारी असून त्यांना संबधित तालुक्यातील पंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान कर्मचारी व मतगणना कर्मचारी नेमण्याचे अधिकार आहेत

लक्ष्य आणि उद्दीष्टे

  1. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये, निर्देशान्वाये व मार्गदर्शक सुचानान्वये पंचायतीच्या निवडणुकाचे संचालन करणे.
  2. पंचायतीची प्रभाग रचना करणे व सरपंच पदाचे/प्रभागांचे आरक्षण निश्चित करणे.
  3. ग्रामपंचायतीच्या निवडणुका खुल्या, मुक्त निकोप वातावरणात घेणे.
  4. निवडून आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
  5. अविश्वास ठरावाबाबतच्या विशेष सभेचे आयोजन करणे.
  6. अपील अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे प्रकरणे चालविणे

जिल्ह्यातील ग्रामपंचायती :-

अ.    क्र. तालुक्याचे नाव ग्रामपंचायतींची संख्या
धुळे १३१
साक्री १६९
शिरपूर ११८
शिंदखेडा १२३
एकूण ५४१