नगरपालिका
रचना
- जिल्हाधिकारी
- उप जिल्हाधिकारी, (प्रशासन)
- जिल्हा प्रशासन, अधिकारी
- अव्वल कारकुण
- लिपिक
- शिपाई
या शाखेमार्फत महानगरपालिका, धुळे व धुळे जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा नगरपरिषद, तसेच शिंदखेडा व साक्री नगरपंचायत या नागरी स्वायत संस्थांचा प्रशासकीय कार्यभार पार पाडला जातो.तसेच सदर नागरी स्वायत्त संस्थांना शासनाकडून प्राप्त विविध अनुदानांना प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी या कार्यालयाकडून पार पाडली जाते.
लक्ष्य आणि उद्दीष्टे
हशासनाकडून प्राप्त होणारे अनुदान महानगनरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत यांना वितरीत करणे, नगरपरिषद/नगरपंचायत या स्थानिक संस्थाच्या सार्वत्रिक निवडणूका पार पाडणे, तसेच शासन व विभागीय आयुक्त, यांचेकडील व इतर आलेल्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करणे, नगरपरिषद/नगरपंचायत यांचा विविध योजनाबाबत मासिक बैठकीचे आयोजन करणे इत्यादी विविध कामे.