• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

पुनर्वसन

रचना

  1. जिल्हाधिकारी
  2. अपर जिल्हाधिकारी
  3. उप जिल्हाधिकारी, (पुनर्वसन)
  4. चिटणीस
  5. अव्वल कारकुण
  6. मंडळ अधिकारी
  7. लिपिक
  8. शिपाई

ही शाखा धुळे जिल्हयातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसीत गावठाणात सर्व देय नागरी सुविधा मुदतीत पुर्ण करणे,प्रकल्पग्रस्तांना दाखले प्रदान करणे,लाभक्षेत्रातील जमिनीवर निर्बंध घालणे व प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर निर्बंध उठविणे ही कार्यालयाची जबाबदारी आहे.

लक्ष्य आणि उद्दीष्टे

पुनर्वसीत गावठाणांत नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणे, ही कामे वेळेवर व्हावीत यासाठी वेळोवेळी आढावा घेणे,पुनर्वसीत गावठाणांत प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करणे, लाभक्षेत्रातील/बुडीत क्षेत्रातील जमिनींना विक्री/वाटणीची परवानगी प्रदान करणे, प्रकल्पग्रस्तांना दाखले देणे, त्यांच्या नोकरी संदर्भात आलेल्या अर्जांवर पत्रव्यवहार करणे, ज्येष्ठतासुचीत नोंद घेणे, त्रैमासिक पुनर्वसन समितीच्या बैठकीचे आयोजन करणे.