बंद

भामेर किल्ला

गिरीदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 2500 मीटर आहे. अहिर राजांची राजधानी म्हणून भामेर किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याने तीन बाजूंनी गावाला वेढले आहे, तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या किल्ल्यावर 184 गुंफा आहेत. त्यापैकी काही गुंफा आपल्याला पाहता येतात.  किल्ल्याच्या पठारावर पाण्याचे टाके व छोटेस मंदिर आहे. किल्ल्यावरुन परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य अवर्णनीय आहे. त्यामुळे एकदा किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे, असा हा किल्ला आहे. 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करीत किल्ल्याचा ताबा घेतला. 1820 मध्ये कालेखानने बंड करुन किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जंने भामेर किल्ल्यावरील महत्वाच्या इमारतींची नासधूस करीत कालेखानचा पाडाव केल्याचे उल्लेख इतिहासात उपलब्ध आहेत.

धुळे शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर, साक्री शहरापासून 13 किलोमीटरवर भामेरचा किल्ला आहे. या किल्ल्यापासून 27 किलोमीटर बळसाणे येथे अंतरावर जैन धर्मीयांचे प्रसिध्द असे तीर्थक्षेत्र आहे. येथेही देशभरातील जैन धर्मीय मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या मंदिरात भगवान विमलनाथ यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १४६ कि.मी. लांब चिखलठाना (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे आहेत मुंबई जे ३०० कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३२४ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २६१ कि.मी.लांब आहे .

रेल्वेने

धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शन शी जोडलेले आहे.

रस्त्याने

धुळे यथे पोहोचण्यासाठी बरेच सोयीचे मार्ग आहेत. धुळे शहर शिर्डी पासुन १४१ कि.मी. , औरंगाबाद पासुन १४६ कि.मी. , इंदोर पासुन २६१ कि.मी. , पुणे पासुन ३२४ कि.मी. व मुंबई पासुन ३०० कि.मी. आणि भोपाळ पासुन ५०३ कि.मी. वर स्थित आहे. हे शहर बऱ्याच मुख्य शहरे जसे कि रायपुर,नागपूर,औरंगाबाद , उदयपुर आणि परभणी इ. शी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ने जोडले गेले आहे.