बंद

थाळनेरचा किल्ला

तापी नदीच्या काठावर शिरपूर तालुक्यात थाळनेर हे बाजारपेठेचे गाव आहे. ते सुरत- बऱ्हाणपूर महामार्गालगत आहे. दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसऱ्या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.

थाळनेर किल्ल्यावर राज्य करणाऱ्या फारुकी घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची कबरी थाळनेर शहरात आहे. त्यांच्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहेत. यात मलिक राजा (1396), मलिक नसीर (1437), मिरान अदील शाह (1441), मिरान मुबारक खान (1457) यांच्या कबरींचा समावेश आहे. थाळनेर हे गाव शिरपूर – चोपडा मार्गावर आहे. येथून जवळच चिंकारांसाठी प्रसिध्द असलेले अनेर अभयारण्य आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १४६ कि.मी. लांब चिखलठाना (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे आहेत मुंबई जे ३०० कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३२४ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २६१ कि.मी.लांब आहे .

रेल्वेने

धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शन शी जोडलेले आहे.

रस्त्याने

धुळे यथे पोहोचण्यासाठी बरेच सोयीचे मार्ग आहेत. धुळे शहर शिर्डी पासुन १४१ कि.मी. , औरंगाबाद पासुन १४६ कि.मी. , इंदोर पासुन २६१ कि.मी. , पुणे पासुन ३२४ कि.मी. व मुंबई पासुन ३०० कि.मी. आणि भोपाळ पासुन ५०३ कि.मी. वर स्थित आहे. हे शहर बऱ्याच मुख्य शहरे जसे कि रायपुर,नागपूर,औरंगाबाद , उदयपुर आणि परभणी इ. शी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ने जोडले गेले आहे.