बंद

लळिंग किल्ला

पूर्व- पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यांवर किल्ले लळिंग आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
धुळे- नाशिक मार्गावर, धुळे शहरापासून दक्षिणेला 9 किलोमीटरवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणत: एक तासाचा कालावधी लागतो. किल्ले लळिंग पाहून झाल्यावर लळिंगचे कुरण, धबधबा (पावसाळ्यात सुरू असतो.) आणि लांडोर बंगला पाहता येईल. या बंगल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 मध्ये काही दिवस वास्तव्य केलेले आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १४६ कि.मी. लांब चिखलठाना (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे आहेत मुंबई जे ३०० कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३२४ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २६१ कि.मी.लांब आहे .

रेल्वेने

धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शन शी जोडलेले आहे.

रस्त्याने

धुळे यथे पोहोचण्यासाठी बरेच सोयीचे मार्ग आहेत. धुळे शहर शिर्डी पासुन १४१ कि.मी. , औरंगाबाद पासुन १४६ कि.मी. , इंदोर पासुन २६१ कि.मी. , पुणे पासुन ३२४ कि.मी. व मुंबई पासुन ३०० कि.मी. आणि भोपाळ पासुन ५०३ कि.मी. वर स्थित आहे. हे शहर बऱ्याच मुख्य शहरे जसे कि रायपुर,नागपूर,औरंगाबाद , उदयपुर आणि परभणी इ. शी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ने जोडले गेले आहे.