सोनगीर किल्ला
किल्ले लळिंग पाहून झाल्यावर धुळे शहरापासून उत्तरेला मुंबई- आग्रा महामार्गावरच 19 किलोमीटरवर सोनगीर गाव आहे. गावाजवळच सुवर्णगिरी किंवा सोनगीरचा किल्ला आहे. तो अतिशय मोक्याच्या जागी बांधण्यात आला आहे. समुद्र सपाटीपासून तो 304 मीटर उंच आहे. 1370 पासून सोनगीरच्या किल्ल्याची माहिती उपलब्ध होते. हा किल्लाही सुरवातीला फारुखी सुलतानांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो मोगल, मराठे आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये तो इंग्रजांनी जिंकून घेतला. गडावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरुज लक्ष वेधून घेतो. या किल्ल्याच्या अवशेषांचीही पडझड झालेली आहे.
कसे पोहोचाल?:
विमानाने
धुळे शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ १४६ कि.मी. लांब चिखलठाना (औरंगाबाद) आहे . हे विमानतळ मुंबई , नागपूर , नवी दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाशी जोडले गेले आहे . दुसरे जवळची विमानतळे आहेत मुंबई जे ३०० कि.मी. लांब आहे आणि पुणे जे कि ३२४ कि.मी. लांब आहे तसेच इंदोर (म.प्र.) २६१ कि.मी.लांब आहे .
रेल्वेने
धुळे शहर रेल्वे ने जोडले गेले आहे , धुळे रेल्वे स्टेशन चाळीसगाव जंक्शन शी जोडलेले आहे.
रस्त्याने
धुळे यथे पोहोचण्यासाठी बरेच सोयीचे मार्ग आहेत. धुळे शहर शिर्डी पासुन १४१ कि.मी. , औरंगाबाद पासुन १४६ कि.मी. , इंदोर पासुन २६१ कि.मी. , पुणे पासुन ३२४ कि.मी. व मुंबई पासुन ३०० कि.मी. आणि भोपाळ पासुन ५०३ कि.मी. वर स्थित आहे. हे शहर बऱ्याच मुख्य शहरे जसे कि रायपुर,नागपूर,औरंगाबाद , उदयपुर आणि परभणी इ. शी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ने जोडले गेले आहे.