बंद

गौण खनिज

संघटना: –

गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी धुळे यांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. भूविज्ञान व खनिकर्म संचनालय , महाराष्ट्र शासन, नागपूर या संचालनालयाने (डीजीएम) नियुक्त केलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी , हे या शाखेस तांत्रिकदृष्ट्या सहाय्य करतात. तालुक्यामधील गौण खनिजांच्या नियंत्रण व नियमन करण्याकरीता तहसीलदार जबाबदार आहेत.

ध्येय आणि उद्दिष्टे: –

  1. गौण खनिज उत्खनन वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे.
  2. दगड / डबर खाणपट्ट्यांना मान्यता देणे .
  3. वाळू घाटांंचा लिलाव करणे.
  4. गौण खनिजांचा अनधिकृत वापर प्रतिबंधित करते.
  5. गौण खनिज उत्खनन, वाहतूक परवाने देणे.

संबंधित कायदा आणि नियम: –

  1. महाराष्ट्र गौण खनिज उत्ख़नन (विकास व विनियमण) नियम 2013
  2. खान व खनिज (विकास व विनियमण)अधिनियम 1957

धुळे जिल्ह्यातील वसुली

अ.क्र वर्ष उद्दिष्ट वसुली लाखात टक्केवारी
२००९-२०१० ७५२.०० १०५४.४१ १४०.२१
२०१०-२०११ १५००.०० २२२९.८० १४८.६५
२०११-१२ १५००.०० २५३०.८० १७२.०२
२०१२-१३ १८५०.०० १६७५.७९ ९०.५८
२०१३-१४ २१००.०० १७४८.९९ ८३.२९
२०१४-१५ २५००.०० १७४०.१४ ६९.६१
२०१५-१६ ३३०५.४४ २१५१.७० ६५.१०
२०१६-१७ ३३००.०० ३४६८.६० १०५.११
२०१७-१८ (माहे ऑक्टों. २०१७ अखेर) ३६००.०० १०४३.५७ २८.९९
एकूण २०४०७.४४ १७६९३.३० ८६.७०