निवडणुक
रचना
- मा.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी
- उप जिल्हा निवडणुक अधिकारी
- नायब तहसिलदार
- अव्वल कारकुण
- लिपिक
- शिपाई
धुळे जिल्हयातील विधानसभा मतदार संघाची मतदार यादी तयार करणे, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक प्राधिकार मतदारसंघाची मतदार यादी तयार करणे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशन आणि पर्यवेक्षणानुसार लोकसभा / विधानसभा / विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका, पोट निवडणूका घेण्याचे कामकाज या शाखेकडून करणेत येते.
लक्ष्य आणि उद्दीष्टे
विधानसभा / विधान परिषदेच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणेसाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार कार्यवाही करणे,
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 व निवडणूका घेण्याचे नियम 1961 नुसार लोकसभा / विधानसभा / विधान परिषदेच्या निवडणूका विहीत मुदतीत घेणे.